समाजामध्ये विविध विषयाबाबत जागृती होऊन समाजामध्ये एकोपा वृद्धिंगत व्हावा या उद्देश्याने मंदिर समितीतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक, वैद्यकीय आणि धार्मिक उपक्रम वेळोवेळी आयोजित केले जातात. त्यातील काही निवडक उपक्रमांची माहिती खालील प्रमाणे:
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आणि इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते यांच्या संयुक्त विद्यमाने
बांधकाम कामगार आरोग्य तपासणी शिबिर दिनांक ७ ऑगस्ट २०२५ ते ८ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० ते ३ या कालावधीत भक्त निवास इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते येथे आयोजित केला होता. या आरोग्य तपासणी शिबिराचा सुमारे ३५ - ४० कुटुंबांनी लाभ घेतला.
हे शिबिर सर्व बांधकाम कामगार तसेच त्यांच्या कुटुंबासाठी फायदेशीर आहे. यामध्ये आरोग्य तपासणी रक्तचाचणी (शुगर, कोलेस्टेरॉल लिव्हर, किडनी यांची कार्यक्षमता इ. तपासणी) झाली नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या कुटुंबासाठी आरोग्य विमा मिळणार आहे. ज्यामध्ये आरोग्यविमा योजनेंतर्गत नजिकच्या, कणकवली, कुडाळ येथील विविध हॉस्पिटलच्या उपचारांसाठी उपयोग होणार आहे.
१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२0 हा रक्तदान मास म्हणून सरकारने साजरा केला.
त्यावेळेच्या कोविड १९ विषाणू प्रादूर्भावाच्या कालावधीत रक्ताची मागणी प्रचंड वाढलेली होती.
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने संस्थानने काळाची गरज ओळखूनगुरुवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२० रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन केले.
यात सुमारे ३५ - ४० जणांनी रक्तदान केले.
हा उत्सव तिथीनुसार साजरा केला जातो शिवप्रतिमेचे पूजन करून उत्सवाची सुरुवात होते. दिवसभर वक्तृत्त्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते. संध्याकाळी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक तसेच रात्री संगीत रजनी हा कार्यक्रम केला जातो. शक्यतो गावातील बाल तरुणांनी या उपक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले जाते जेणे करून त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा किंवा व्यासपीठ प्राप्त व्हावे हाच यामागे संस्थानचा उद्देश आहे.
नेत्ररोगाचे निदान वेळीच होणे गरजेचे असते. पण खेडागांवात तशी संसाधने उपलब्ध नसल्याने तसेच वेळीच निदान न झाल्याने दृष्टीविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणून संस्थानने नेत्ररोग निदान शिबीराचे आयोजन केले. यात सुमारे प्रत्येकी ₹३००/- किमतीचे चांगल्या प्रतीच्या चष्म्यांचे वाटप संस्थान मार्फत गरजूंना करण्यात आले. या उपक्रमाचा सुमारे ११० ग्रामस्थांनी लाभ घेतला.
जगभरात पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ग्लोबल वॉर्मिंग चे दुष्परिणाम संपूर्ण जग भोगत आहे. 'झाडे लावा , जगवा आणि संवर्धन करा' हाच मूलमंत्र यावर खात्रीदायक उपाय आहे. पूर्वी मंदिराच्या देवराई होत्या. त्या देवराईला धार्मिक अधिष्ठान होते. त्यामुळे यामध्ये वृक्षतोड होत नसे. हाच आधार घेऊन वृक्षारोपणाचे कार्य देवीच्या नावे आणि देवीच्या पुढाकाराने घ्यावे म्हणजे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभेल हि खात्री असल्याने संस्थानने हा उपक्रम आयोजित केला. त्याला उत्स्फूर्त सहभाग मिळाला. कोटकामते आणि लिंगडाळ या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा सुमारे २०० जंगली झाडे लावण्यात आली .
पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आधुनिकतेच्या नावाने आपल्या धार्मिक, सांस्कृतिक मूल्यांचा ऱ्हास होत चालला आहे. आपल्या मुलांना आपली संस्कृती, धर्म याची ओळख दुरापास्त होत चालली आहे. म्हणूनच आपल्या धार्मिक, संस्कृतीचे रक्षण व्हावे, आपल्या मुलांना ती कळावी यासाठी संस्थानतर्फे वर्षभर "बालसंस्कार वर्ग " आयोजित केले जातात . यामध्ये गावातील सर्व मुले उत्स्फूर्तपणे आणि मोठ्या संख्येने भाग घेतात.
भाविक आपल्या इच्छेनुसार 'पोस्टाने (मनीऑर्डरने)' देणगी देऊ शकतात.
यासाठी खालील पत्यावर मनिऑर्डर करावी.
मा. व्यवस्थापक,
इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११
भाविक आपल्या इच्छेनुसार 'ऑनलाईन' पद्धतीने देणगी देऊ शकतात.
यासाठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:-
Account Name:
Shree Devi Bhagavati Sansthan Kotkamate.
Account No: 37600745201
Bank: State Bank of India
Branch: Talebazar
IFS Code: SBIN0016535.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देणगीसाठी QR CODE
जवळचे रेल्वे स्टेशन - १. नांदगाव २. कणकवली
इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११
या वेबसाईटचे उद्घाटन आश्विन शु. ६,शनिवार दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी मा. सेनासरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे दहावे वंशज मा. सरखेल आर्यनराजे आंग्रे यांच्या शुभहस्ते झाले.
©2022 इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते. I All Rights Reserved
Design, Developed & Donated By Mangesh Sitaram Monde, Mumbai (Kotkamate)