सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध दशमी, अर्थात विजयादशमी पर्यंत येथे शारदीय नवरात्रौत्सव मोठया भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रौत्सव हा गावाचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव आहे. आई भगवतीचा नऊ दिवस जागर केला जातो. या उत्सवाला जिल्ह्यातील भाविकही मोठ्याप्रमाणात दर्शनाला येतात. या दिवसात चाकरमानी मंडळी गावात पोहोचतातच.
हा सोहळा इतिहासकालीन पद्धतीने साजरा होतो. नवरात्रौत्सवात नऊ दिवस मध्यरात्री १२ नंतर चांदीचे पेटते ताट घेऊन देवी भक्तांशी संवाद साधते. भक्तांच्या समस्या निवारण्यासाठी तिच्या समोर सारे जण नतमस्तक होतात. देवीच्या ताटाचा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध असून नवरात्रौत्सवातील अष्टमी दिवशी देवीचे हे ताट घेऊन संचार भक्तांच्या घराघरापर्यंत पोहोचतो. हा उत्सव नेत्रदीपक असतो. देवीची ही ख्याती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी भक्तांची मांदियाळी फुललेली असते.
कोटकामतेच्या श्री भगवती देवीचा उत्सव हा कित्येक शतकापासून शाही दिमाखात सुरू आहे. सकाळी सनई वादन, दुपारी नौबत, संध्याकाळी पुन्हा सनई वादन, शास्त्रीय सुगम संगीत बैठक, भजने, प्रवचन, महाआरती, रात्री देवीची निघणारी पालखी प्रदक्षिणा , नंतर उधळला जाणारा गुलाल, अत्तर, दिले जाणारे मानाचे विडे इत्यादी कार्यक्रम होतात. शास्त्रीय सुगम संगीत बैठकीला अनेक नामवंत शास्त्रीय गायक आपली सेवा देतात. , देवीच्या उत्सवाला सुरुवात होण्यापूर्वी डागली जाणारी तोफ आणि हा उत्सव सुरू झाल्यापासून संपेपर्यंत देवीची पेटवली जाणारी मशाल हे सारे नेत्रदीपक असते. खरे आश्चर्य असते ते देवीचे पंचतत्त्वांचे दर्शन देणारे ताट.
मध्यरात्री देवीचा संचार हा ताट घेऊन उभा राहतो. या अडीच ते तीन किलोच्या चांदीच्या ताटात पाच दिवे पंचतत्त्वांच्या रूपाने पेटविले जातात. दिव्यांच्या वाती सुरू होतात. काकडय़ांना उडदाच्या पिठाने चिकटविले जाते. त्यावर तिळाचे तेल ओतले जाते. प्रत्येक मानकरी आपापले काम करण्यासाठी पुढे होतो.प्रत्येक सेवेकरी आपापली सेवा बजावू लागतात. देवीला मनोमन प्रार्थना करून देवीचे हे ताट घेऊन संचार उभा होतो. मध्यरात्री मग भक्तांच्या समस्या निवारणासाठी थेट देवी मंदिरात उभी राहते. देवीच्या समोर प्रत्येक भक्तगण आपापल्या व्यथा सांगू लागतात. प्रत्येकाचे समाधान होईल असा देवी निवाडा करू लागते. भक्ताला श्रद्धेची अनुभूती येऊ लागते. प्रत्येक रात्री असंख्य भक्त देवीच्या दरबारात हजर असतात. नवरात्र उत्सवातील नऊ रात्री देवी आपल्या भक्तांसाठी थेट दरबारात येते. अडीच ते तीन तास हा दरबार सुरू असतो. वजनशीर ताटात पेटलेल्या वातीने ताट गरम झालेले असले तरी तळहातावर ताट घेऊन देवीचा संचार प्रत्येक भक्ताची साद ऐकत असतो. कधी-कधी रसरशीत तेल संचाराच्या अंगावरही उडते. परंतु, आजपर्यंत कधीही विपरीत काही घडल्याचे ऐकीवात नाही. हे देवीचे ताट प्रतिपदेपासून नवमीपर्यंत नेहमीच भक्तांच्या दर्शनासाठी संचाराच्या तळाहातावरून दरबारात येत असते. अष्टमी दिवशी संचार ही पंचारती घेऊन वाजत-गाजत सर्व सेवेकरांच्या समवेत प्रत्येक भक्ताच्या घरापर्यंत पोहोचतो. मंदिर परिसरातील सर्वच घरांमध्ये हे ताट फिरत असते. या ताटाचा उत्सव म्हणजे एक श्रद्धेची अनोखी परंपराच आहे. ही परंपरा तशीच सुरू आहे. तबकातील पंचारती म्हणजे पंचमहाभुतांचे प्रतीक समजले जाते. देवीच्या प्रत्येक उत्सवात मशाल पेटविल्याशिवाय तिचा प्रारंभ होत नाही आणि मशाल विझविल्याशिवाय कार्यक्रम संपत नाही. नवमीच्या रात्री सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो. त्या रात्री श्री भगवती देवीचा संचार ब्राह्मणदेवासहित अन्य देवताच्या भेटी त्यांच्या स्थळांकडे प्रत्यक्ष जाऊन घेते. त्यावेळी भक्तमंडळीही तिच्या मागून जातात. त्या रात्री उत्सवास सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार प्रत्यक्ष देवीच्या हस्ते श्रीफळ देऊन मानले जातात.
विजयादशमीदिवशी सायंकाळी वाजतगाजत मिरवणुकीने गावकऱ्यांसोबत श्री भगवती देवीचा व अन्य देवतांचे संचार सोने लुटण्याचा कार्यक्रम करतात आणि या नवरात्रौत्सवाची सांगता होते.
अश्विन महिन्यात गावचा प्रमुख ग्रामोत्सव म्हणजेच 'नवरात्रौत्सव' साजरा होतो.
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी (दसरा) याकालावधीत हा संस्थानिक थाटाचा शारदिय नवरात्रोत्सव पार पडतो.
या उत्सवात मंदिराचा दिनक्रम पुढील प्रमाणे असतो
या दिनक्रमात अष्टमी दिवशी संध्याकाळी श्रींचा संचार आपल्या साजासहीत श्री देव जैन आकार ब्राह्मणाच्या भेटीला जातो. त्यानंतर श्रींच्या पंचारती ताटाची पूजा होते हे पूजन मानकरी, देवसेवक ग्रामस्थ भाविक इ. सर्वजण करतात.
नवमी दिवशी मंदीरात चंडी होम हवन होते आणि सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप होते.
विजया दशमी म्हणजेच दसऱ्यादिवशी चारही शिवकळा आपल्या साजासहीत संस्थानिक थाटात आपटा पूजन आणि सोने लुटण्याच्या कार्यक्रम करतात.
भाविक आपल्या इच्छेनुसार 'पोस्टाने (मनीऑर्डरने)' देणगी देऊ शकतात.
यासाठी खालील पत्यावर मनिऑर्डर करावी.
मा. व्यवस्थापक,
इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११
भाविक आपल्या इच्छेनुसार 'ऑनलाईन' पद्धतीने देणगी देऊ शकतात.
यासाठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:-
Account Name:
Shree Devi Bhagavati Sansthan Kotkamate.
Account No: 37600745201
Bank: State Bank of India
Branch: Talebazar
IFS Code: SBIN0016535.
स्टेट बँक ऑफ इंडिया
देणगीसाठी QR CODE
जवळचे रेल्वे स्टेशन - १. नांदगाव २. कणकवली
इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११
या वेबसाईटचे उद्घाटन आश्विन शु. ६,शनिवार दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी मा. सेनासरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे दहावे वंशज मा. सरखेल आर्यनराजे आंग्रे यांच्या शुभहस्ते झाले.
©2022 इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते. I All Rights Reserved
Design, Developed & Donated By Mangesh Sitaram Monde, Mumbai (Kotkamate)