आमच्याविषयी

kotkamate bhagavati devi
।। सुस्वागतम ।।

श्री देवी भगवतीमातेच्या सर्व भक्तांचे आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत.

श्री देवी भगवतीमातेचे महात्म, ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि मंदिरातील दैनंदिन तसेच वार्षिक उत्सवांची सुयोग्य माहिती सर्व भाविकांपर्यंत पोहोचावी यासाठी श्रीकृपेने केलेला हा छोटासा प्रयत्न...!

कोकण…..भगवान परशुरामांची पावन भूमी. ईश्वराचा कृपाप्रसाद , अध्यात्मिक अधिष्ठान आणि निसर्गाची मुक्तहस्ते उधळण लाभलेली हि पवित्र भूमी. पूर्वेला सह्याद्रीची पर्वतरांग आणि पश्चिमेला अथांग सागर. या पावन भूमीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यात, देवगड तालुक्यातील 'कोटकामते' हे एक गाव. चारही बाजूनी डोंगरांनी वेढलेले, बारमाही वाहती नदी, सुजलाम सुफलाम असे हे नयनरम्य गाव. ऐतिहासिक आणि आध्यत्मिक अधिष्ठान लाभलेले हे गाव. या गावाची ग्रामदैवत ' देवी भगवती माता'. एक जागृत देवस्थान.

मंदिरातील दैनंदिन पूजाविधी

सकाळी ६ वाजता - श्रींच्या दर्शनासाठी मंदिराचे द्वार उघडते.

त्यानंतर श्रींची नित्य पूजा होते.

रात्री ८ वाजेपर्यंत - मंदिर भाविकांना श्रींच्या दर्शनासाठी खुले असते.

रात्री शेजारती झाल्यावर मंदिराचे द्वार बंद होते.

उत्सव किंवा अन्य काही वार्षिक उत्सव असल्यास दिनक्रम वेगळा असतो.

कोटकामते तसेच पंचक्रोशीतील जनमाणसांसाठी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध

इनामदार श्री देवी भगवती संस्थानच्यावतीने रुग्णवाहिकेसाठी दानशूर भक्तांना आवाहन केले होते. त्या आवाहनास प्रतिसाद देऊन आणि परिस्थीतीची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीचे भान राखून नीता आणि कृष्णाबाई शंकर (मास्तर) तानवडे यांच्यातर्फे डॉ. साधना व डॉ आनंद शंकर तानवडे यांचे द्वारा श्री. नाना तानवडे यांच्या सहकार्याने रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी आपल्या संस्थानला रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे अत्यवस्थ स्थितीतील रुग्णांची होणारी गैरसोय टळणार आहे, तसेच तातडीचे उपचार त्यांना मिळणे शक्य होईल. रुग्णवाहिका हि येथील काळाची गरज झाली आहे आणि त्याची पूर्तता डॉ. साधना व डॉ आनंद शंकर तानवडे तसेच श्री. नाना तानवडे यांच्या माध्यमातून झाली आहे. या मदतीसाठी संस्थान त्यांचे अत्यंत आभारी आहे

तसेच यासारखे आवश्यक आरोग्य विषयक उपक्रम उदा. विविध आरोग्य तपासणी शिबिरे, गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींना औषधोपचारात मदत करण्यासाठी आपणासारख्या सामाजिक बांधिलकीचे भान असणाऱ्या सेवाभावी, दानशूर व्यक्तींच्या सहकार्याची अत्यंत गरज आहे.

आम्ही आपणास विनम्र निवेदन करतो कि हि सेवा उपलब्ध करण्यासाठी आपण सढळ हस्ते आम्हास आर्थिक मदत करावी.

भाविक आपल्या इच्छेनुसार 'ऑनलाईन' पद्धतीने देणगी देऊ शकतात.

यासाठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:-

Account Name:
Inamdar Shree Devi Bhagavati Sansthan Kotkamate.
Account No: 001400000006427
Bank: Sindhudurg District Central Co-operative Bank Ltd.
Branch: Devgad
IFS Code: SIDC0001001.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
धन्वंतरी फंड साठी QR CODE

Sindhudurg bank QR Code

नवरात्रौत्सव

आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध दशमी, अर्थात विजयादशमी पर्यंत येथे शारदीय नवरात्रौत्सव मोठया भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रौत्सव हा गावाचा सर्वात मोठा वार्षिक उत्सव आहे. आई भगवतीचा नऊ दिवस जागर केला जातो. या उत्सवाला जिल्ह्यातील भाविकही मोठ्याप्रमाणात दर्शनाला येतात. या दिवसात चाकरमानी मंडळी गावात पोहोचतातच.

हा सोहळा इतिहासकालीन पद्धतीने साजरा होतो. नवरात्रौत्सवात नऊ दिवस मध्यरात्री १२ नंतर चांदीचे पेटते ताट घेऊन देवी भक्तांशी संवाद साधते. भक्तांच्या समस्या निवारण्यासाठी तिच्या समोर सर्वजण नतमस्तक होतात. देवीच्या ताटाचा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध असून नवरात्रौत्सवातील अष्टमी दिवशी देवीचे हे ताट घेऊन संचार भक्तांच्या घराघरापर्यंत पोहोचतो. हा उत्सव नेत्रदीपक असतो. देवीची ही ख्याती पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी भक्तांची मांदियाळी फुललेली असते.

भक्तनिवास

श्री देवी भगवतीमातेचे महात्म आणि असलेली ऐतिहासिक पार्श्वभूमी यामुळे माऊलीचा भक्तगण-परिवार खूप मोठा आहे. महाराष्ट्रासहित पूर्ण देशभर पसरलेला आहे. त्यामुळे दूरदूरून भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात. याचा विचार करून बाहेरगावाहुन येणाऱ्या भाविकांची सुसज्ज राहण्याची व्यवस्था व्हावी या उद्देशाने सन २०१८ साली देवस्थान आणि तानवडे सार्वजनिक संघ मुंबई - पडेल यांच्या संयुक्त विद्यमाने भक्त-निवास बांधला.

प्रेक्षणीय स्थळे

देणगी

भाविक आपल्या इच्छेनुसार 'पोस्टाने (मनीऑर्डरने)' देणगी देऊ शकतात.

यासाठी खालील पत्यावर मनिऑर्डर करावी.

मा. व्यवस्थापक,
इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११

भाविक आपल्या इच्छेनुसार 'ऑनलाईन' पद्धतीने देणगी देऊ शकतात.

यासाठीची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे:-

Account Name:
Shree Devi Bhagavati Sansthan Kotkamate.
Account No: 37600745201
Bank: State Bank of India
Branch: Talebazar
IFS Code: SBIN0016535.

स्टेट बँक ऑफ इंडिया
देणगीसाठी QR CODE

State Bank of India QR CODE

मंदिराकडे जाण्याचे मार्ग

जवळचे रेल्वे स्टेशन - १. नांदगाव     २. कणकवली

  1. मालवण आणि कणकवली पासून सुमारे ५५ किमी अंतरावर हे गाव आहे.
  2. मालवण - देवगड रस्त्यावर मालवण पासून ३० किमी अंतरावर नारिंग्रे गाव आहे. या गावातून उजव्या बाजूस जाणारा रस्ता ५ किमी वरील कोटकामते गावात जातो.
  3. देवगड - जामसंडे - तळेबाजार - तिठा यामार्गे (अंतर अंदाजे २० किमी) कोटकामते गावात जाता येते.
मंदिराचा पत्ता

इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.
मु: पो. कोटकामते, देऊळवाडी.
व्हाया- तळेबाजार,
तालुका - देवगड,
जिल्हा - सिंधुदुर्ग.
पिन - ४१६६११

ई-मेल

devishreebhagwati@gmail.com

isdbhagwatikotkamate@gmail.com

   

जय जगदंबे आई भगवती गीत

गीतकार : श्री.मंगेश सिताराम मोंडे.

संगीतकार : श्री. प्रणव घाडी .

गायक :श्री. कमलाकर पाटकर

या वेबसाईटचे उद्घाटन आश्विन शु. ६,शनिवार दि. १ ऑक्टोबर २०२२ रोजी मा. सेनासरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे दहावे वंशज मा. सरखेल आर्यनराजे आंग्रे यांच्या शुभहस्ते झाले.

©2022 इनामदार श्री देवी भगवती संस्थान , कोटकामते.   I   All Rights Reserved

Design, Developed & Donated By Mangesh Sitaram Monde, Mumbai (Kotkamate)